political

मोहिते पाटील यांचे राजकीय कर्तुत्वाचा आलेख महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत पोहोचवणारा अकलूजचा विजय चौक

मोहिते पाटील यांचे राजकीय कर्तृत्वाचा आलेख महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत पोहचवणारा अकलूजचा विजय चौक

संचार वृत्त

बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार

अकलूजला आशिया खंडात पोहचवण्याची किमया केलेली अकलूज ग्रामपंचायत असो किंवा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी परदेशातून सर्वात प्रथम शेतकऱ्यांना जोडधंदा व त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी आणलेल्या संकरित जर्सी गाई असोत या व अनेक नाविण्यपूर्ण विकासात्मक कामांचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात कायम वाजला व गाजला ते ठिकाण म्हणजे अकलूज येथील ऐतिहासिक विजय चौक या विजय चौकातून सहकार महर्षींनी अनेक सभा गाजवल्या अनेक महत्वाचे निर्णय घेतले अनेक घोषणा केल्या व प्रत्यक्षात साकारल्या तो विजय चौक मोहिते पाटील यांचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक परिवर्तनवादी विचारांची गर्जना झाली व मोहिते पाटील घराण्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत विराजमान केले तो विजय चौक या विजय चौकात महाराष्ट्राचे अनेक वजनदार नेते मुख्यमंत्री आमदार खासदार अनेक सेलेब्रिटी यांनी हजेरी लाऊन सभा गाजवली त्यात शरद पवार विलासराव देशमुख प्रमोद महाजन छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे सुशीलकुमार शिंदे आर आर आबा रामदास आठवले व अनेक सत्ताधारी मंत्री नेते यांचें पदस्पर्श लागले आहेत त्यामुळे अकलूजचा विजय चौक या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत अकलूजची विजयी घोडदौड अनेक बदलांचे संकेत या चौकाने पाहिले आहेत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी मध्ये अकलूज विकसित होत गेलं नावारूपाला आले सुरुवातीला अगदी मध्यम शहर असणारे अकलूज आज चौहुबाजूने विस्तारले आहे इथे व्यापार उद्योग आरोग्यसेवा शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या रोजगार वाढला आधुनिकीकरण झाले याच अकलूजचे विजय चौकात अनेक मर्दानी खेळाची जोपासना झाली लेझीम खेळाला ऊर्जितावस्था मिळाली अनेक प्रसंग घटना बोलक्या आहेत मोहिते पाटील घराण्याचा सामाजिक राजकीय अध्याय कळसाला पोहोचविणारा विजय चौक या बद्दल हल्लीच्या युवा पिढीला इतिहास माहीत असावा त्यामागची प्रेरणा घेऊन त्यातून बोध घेता आला तर घ्यावा हा उद्देश आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाने विजय वसतीगृह विजय चौक हे नामकरण केले आहे विजयसिंह मोहिते पाटील यांची राजकीय कारकीर्द अकलूजचे सरपंच ते सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार मंत्री उपमुख्यमंत्री खासदार अशी विजयी घौडदौड सुरू झाली या वाटचालीत सोलापूर जिल्ह्यात त्यांनी अनेक सामाजिक राजकीय निर्णय घेऊन कार्यकर्त्यांची फौज घडवली जिल्ह्यातील राजकारणाची अकलूज ही राजधानी बनवली जिल्ह्यातील आजचे अनेक मातब्बर नेते लढाऊ कार्यकर्ते घडले ते अकलूजचे मोहिते पाटील यांच्या राजकीय आखाड्यात बदल होत असतात सत्तांतर होत असते राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो राजकारणात सारेच काही आलबेल नसते अकलूजचे याच विजय चौकातून सामाजिक एकतेचे धडे गिरवले गेले त्यामुळे अकलूज मध्ये सर्व जाती धर्म अनेक संघटना सर्वधर्मसमभाव जोपासताना पहायला मिळतात ही सर्व शांतता प्रिय समन्वयक घडी मोहिते पाटील यांचे नेतृत्वाने बसवली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button