महाराष्ट्राचा लाडका शाहीर राजेंद्र कांबळे यांना अकलूज भूषण पुरस्कार मिळावा
महाराष्ट्राचा लाडका शाहिर राजेंद्र कांबळे यांना अकलूज भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे
श्रीपुर (बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
नुकताच ज्यांना महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाचे वतीने शाहीरी मधून लोकरंजन मनोरंजन व ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या दमदार पहाडी आवाजाने शाहिरी कला जोपासली वाढवली व सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले ते माळशिरस तालुक्याचे सुपुत्र खुडूस गाव जन्मभूमी पण कर्मभूमी अकलूज असलेले शाहिर राजेंद्र कांबळे यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मान केला आहे अशा या हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व लोकसाहित्य दलित चळवळ आंबेडकरी विचारधारा व पुरोगामी महापुरुषांच्या कार्यप्रणालीवर पोवाडे गीत सादर करून त्यांचे विचार सामाजिक कार्य जनमानसात प्रसारित केलेले शाहिर राजेंद्र कांबळे यांना अकलूज नगरपरिषदेने अकलूज भूषण पुरस्कार देऊन त्यांचा नागरी सत्कार केला पाहिजे अशी मागणी माळशिरस तालुक्यातील विद्रोही सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तून होत आहे शाहीर राजेंद्र कांबळे यांनी अकलूजचे नाव महाराष्ट्रभर नव्हे भारतभर केले आहे समाजातील बुरसटलेले व अंधश्रद्धा जोपासणाऱ्या प्रवृती विरोधात त्यांनी कडक शब्दात शाहिरी तून आवाज उठवला आहे व्यसनमुक्त समाजाला जागेवर आणण्यासाठी आपले परखड निर्भीड विचार कलेतून मांडले