श्रीपुर नगरपंचायत चे कंत्राटी कर्मचारी संपावर स्वच्छता साफसफाई कोलमडली
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे कंत्राटी कर्मचारी संपावर स्वच्छता साफसफाई कोलमडली
श्रीपुर (बी.टी. शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे कंत्राटी कर्मचारी गेले चार दिवसांपासून वेळेवर पगार होत नसल्याचे कारणावरून संपावर गेले आहेत त्यामुळे श्रीपूर महाळुंग मधील स्वच्छता साफसफाई यंत्रणा कोलमडली आहे घरोघर जाऊन कचरा गोळा करणाऱ्या कचरा गाड्या बंद असल्याने कचरा साचलेला आहे नगरपंचायतीने पुण्याचे भाग्य दीप वेस्टेज मॅनेजमेंट या ठेकेदाराला स्वच्छता व साफसफाई चा वार्षिक ठेका दिला आहे या ठेकेदाराकडे हे सर्व कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यांचा चार चार महिने पगार मिळत नसल्याने ते शनिवार पासून संपावर गेले आहेत या बाबत नगरपंचायतचे संबंधीतांना विचारले असता त्यांनी सांगितले की ठेकेदाराला नगरपंचायती ची जी कामे ठरवून दिलेली आहेत ती नियमित व बरोबर होत नाहीत तसेच त्यांना ठेका दिला आहे त्यांच्याकडील कर्मचारी यांचा पगार त्यांनी करायचा आहे आम्ही नगरपंचायत कडून ठरलेल्या टेंडर प्रमाणे त्यांचे बील देतं असतो थोडं पुढे मागे झाले आहे पण कर्मचारी यांचा पगार ठेकेदार यांनी द्यायची त्यांची जबाबदारी आहे ठेकेदार यांचा स्थानिक व्यवस्थापक यांना विचारले असता त्यांनी सांगितले काम सुरू केल्या पासून नगरपंचायत आम्हाला चार चार महिने पगार काढत नाही त्यामुळे हातांवर पोट असलेले सफाई कर्मचारी झाडू वाल्या महिला यांना जर चार महिने पगार मिळत नसेल तर त्यांनी घर प्रपंच कसा चालवायचा या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कडून एक महिन्याचा परवा पगार काढला असल्याचे सांगण्यात आले.