solapur

सोलापूर जिल्हा परिषदेवरती भाजपचा भगवा फडकणार ? भाजपचा डाव काय 

संचार वृत्त अपडेट 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचेही ताकद आहे.भाजपा शिवसेनेचे युती असतानाही तब्बल 1960 पासून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवता आली नाही 2014 नंतर जसं देशात भाजपसाठी चित्र बदललं तशीच परिस्थिती जिल्ह्यातही दिसून आली सोलापूर जिल्ह्यातही भाजपची ताकद वाढली सध्या अक्कलकोट,माढा, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर,शहर मध्य,पंढरपूर मंगळवेढा येथे भाजपचे आमदार आहेत तरीपण सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवणं भाजपसाठी आत्तापर्यंत अशक्य राहिले.आता हेच समीकरण ओळखून फडणवीस,गोरेच्या जोडीने पहिला डाव आखत विरोधी पक्षातील माजी आमदारांना म्हणजेच ज्या तालुक्यात आतापर्यंत भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळालं नाही.

असे तालुक्यातील माजी आमदार ना सोबत घेत आहे. सोलापूर जिल्ह्याची रचना 1871 मध्ये सातारा जिल्ह्याचा काही भाग समावेश करून करण्यात आली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर ती सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला. जिल्हा परिषदेची स्थापना ग्रामविकास विभागाच्या स्थापनेनंतर म्हणजेच एक मे 1960 रोजी झाली. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं.आता माढा,सांगोलातल्या प्रत्येकी सात दक्षिण सोलापूर आणि मोहोळ मधील प्रत्येकी सहा आणि अक्कलकोट मधील सहा पंढरपुरातील आठ मंगळवेढ्यातील चार आणि माळशिरस मधील सर्वाधिक नऊ सदस्य निवडून आल्यास भाजपाची एक हाती सत्ता शक्य आहे

पण सांगोला शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे. सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत. दुसरीकडे माढा, करमाळा,मोहोळ, बार्शी माळशिरस मध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनाही आपली ताकद राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये दाखवावे लागणार आहे. या पार्श्वभूमी वरती राज्याच्या ग्रामविकास मंत्रांच्या सोलापुरातील माजी आमदारांच्या पक्षांतरांचा मुद्दा यशस्वी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.2017 मधील झेडपी निवडणुकी वेळी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रत्येक जिल्ह्यातील समविचारी नेत्यांची बोट बांधली राजेंद्र राऊत, संजय मामा शिंदे, सुरेश हसापुरे,विजय डोंगरे, अशा नेत्यांना सोबत घेतलं आणि डाव यशस्वी केला. पण भाजपच्या चिन्हावरील अध्यक्ष होऊ शकला नाही

अपक्ष सदस्य संजय मामा यांना सर्वांनु मते अध्यक्ष करण्यात आलं. पण सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच व्हावा यासाठी मोहोळ म्हणजे राजन पाटील, यशवंत माने, सांगोला दीपक साळुंखे, दक्षिण सोलापूरच्या दिलीप माने, माढ्याचे बबनराव शिंदे या माजी आमदारांना थेट पक्षातच घेण्याचा नियोजन केले. सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 गट आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपने काही तालुक्यात मित्र पक्षाला जरी सोबत घेतलं तरी भाजप बहुमताचा 35 चा आकडा पार कळेल. त्या दृष्टीने पालक मंत्री गोरे यांचे नियोजन असणार आहे. अशी माहिती आहे.पण गोरे यांच्या नियोजनाला मतदार यश देतो का आणि फडणवीस कोणाच्या जोडीला घेवून सोलापूर जिल्हा परिषदेवरती आपल्या पक्षाचा म्हणजेच भाजपला झेंडा फडकवता येतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button