आशा रमेश लोंढे हिची पुणे सिटी पोलिस दलात निवड
आशा रमेश लोंढे हिची पुणे सिटी पोलिस दलात निवड
श्रीपूर(संचार वृत्त)
श्रीपूर येथील कु आशा रमेश लोंढे हीची पुणे सिटी पोलिस दलात पोलीस शिपाई म्हणून निवड झाली आहे ती पदवीधर असून तीला खेळाची आवड आहे ब्रिमा सागर महाराष्ट्र डिसटलरी श्रीपूर मध्ये सुरक्षा विभागात जमादार असलेले रमेश लोंढे यांची ती मुलगी आहे तसे महाराष्ट्र फृट विक्रेते प्रथमेश व हर्षद लोंढे यांची ती लहान बहीण आहे अकलूज येथील पोलिस अकेडमी या संस्थेत तीने प्रशिक्षण घेतले आहे तिचं शिक्षण श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे अत्यंत गुणी व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या आशा लोंढे हीची पुणे सिटी पोलिस दलात निवड झाल्याने तिचं सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे तीने मनाशी जिद्द व ध्येय ठेवले होते पोलिस खात्यात जाण्याचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिनं कोणाचाही कसला पाठींबा सहकार्य मार्गदर्शन नव्हते तरी स्वतःच्या मनोबळावर व जिद्द मनात ठेवून तिने पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण केले ही बाब वाखाणण्याजोगी आहे