प्रताप क्रीडा मंडळाच्या बाल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
कला,क्रीडा,सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर- अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते- पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते- पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूज येथे बालक्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे शुभहस्ते व दिपकराव खराडे-पाटील, प्रदिपराव खराडे-पाटील,हर्षवर्धन खराडे-पाटील,महादेव अंधारे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या स्पर्धेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या व बाल खेळाडूंच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मैदान पूजनाने व आकाशात कबुतरे सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेत तालुक्यातील २२ शाळांतून विविध गटातील ११८३ मुले व १०१७ मुली असे एकूण २२०० बाल खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेतील गटनुसार प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे –
लहानगट-डोक्यावर चेंडू घेऊन पळणे (४० मी.) या गटात (मुली) प्रथम -शिवश्री सचिन माने- देशमुख,द्वितीय-काव्या वनोद शिंदे,तृतीय वेदांती पप्पू चव्हाण, (मुले) प्रथम-ध्रुवतेज राजकुमार देशमुख,द्वितीय-विनायक अजित इंगळे,तृतीय-अलीमोहम्मद रमजान नदाफ .
मोठा गट-धावणे (६०मी.) या गटात (मुली) प्रथम-स्वराली गजानन पवार,द्वितीय-भक्ती विशाल लिके,तृतीय-श्रीशा सुरेश गोडसे.(मुले) प्रथम-धारासिंह राहुल लोमटे,द्वितीय-शिवांश सुमित सावंत,तृतीय-निखिल तुकाराम जाधव,
इयत्ता १ ली कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे (४० मी.) (मुली) प्रथम-शौर्या अमोल क्षिरसागर,द्वितीय-जानवी गजानन बनसोडे,तृतीय-अनुश्री जालिंदर एकतपुरे,(मुले) प्रथम-विराज सोमनाथ लोखंडे, द्वितीय-पवन धनाजी मेढे,तृतीय -स्वराज मिलिंद कुंभार,
इयत्ता २ री.लंगडी घालत जाणे (४०मी.) (मुली)- प्रथम-योगी मनोज घोडके,द्वितीय-दूर्वा सुशांत केमकर,तृतीय-कृष्णप्रिया योगेश मिटकल,(मुले) प्रथम-राजवीर अमित कुमार यादव,द्वितीय- अथर्व दिपक खिचडे,तृतीय – राजदीप प्रदीप बुराडे,
इयत्ता 3 री-तीन पायाची शर्यत (४० मी.) (मुले) प्रथम-प्रज्वल ज्ञानेश्वर दुधाळ व शिवतेज भारत राजेभोसले,द्वितीय-अथर्व भारत क्षिरसागर व फैज सलीम बागवान,तृतीय-प्रणव सुरज कोरे व साईराज किरण साठे.(मुली) -प्रथम-इंद्रायणी संतोष वाघ व स्वरा सिताराम गुरव,द्वितीय- स्वरांजली धनाजी शिंदे व निकिता भाऊ वाघमारे,तृतीय-यशोधरा अमोल रेडे पाटील व ज्ञानेश्वरी अभिजीत विभुते,
इयत्ता ४ थी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे (५० मी.)(मुली) प्रथम-अनुष्का अमोल थिटे,द्वितीय-श्रेया जगन्नाथ मदने, तृतीय-अनुष्का महादेव जाधव. (मुले) प्रथम-सत्यजित पांडुरंग सूळ,द्वितीय-चैतन्य हरिदास पारसे,तृतीय-प्रताप सोमनाथ लोखंडे यांचेसह अनेक उत्तेजनार्थ बक्षीसेही स्पर्धकांनी पटकावली.
प्रथम तीन खेळाडूंना अनुक्रमे सायकल,कॅरम बोर्ड, स्कुल बॅग,टिफिन बॉक्स, प्रमाणपत्र तर चतुर्थ व पंचम क्रमांकास प्रमाणपत्र देण्यात आले.सर्व सहभागी खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील,सचिव बिभीषण जाधव,स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे,भानुदास आसबे, संजय राऊत,अर्जुन बनसोडे, यशवंत माने-देशमुख,सर्व पंच, क्रीडा शिक्षक,मंडळाचे सर्व संचालक,शाखाप्रमुख,मंडळाचे सदस्य,पालक,प्रेक्षक व बहुसंख्येने खेळाडू उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण सूर्यवंशी,राजकुमार पाटील यांनी केले.आभार भानुदास आसबे यांनी मानले. मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजावतरण करून स्पर्धेचा समारोप झाला. सर्व समितीतील सदस्यांच्या अचूक नियोजनमुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.