अकलूज येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी “रास्ता रोको आंदोलन”
अकलूज येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी “रास्ता रोको आंदोलन”
संचार (वृत्तसेवा) धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मागील दोन-तीन दशके समाज बांधव आंदोलन करत आहे मात्र शासन त्याकडे डोळे झाक करत असल्याने सर्वानुमते दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यात सर्वत्र या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे शासनाला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने
आज सकाळी ठिक 11 00 वाजता अकलूज आणि परिसरातील धनगर समाजाच्या वतीने ST अराक्षण अंमलबजावणी साठी राज्यस्तरीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते
हे आंदोलन इंदापूर अकलूज रोडवरील सराटी पुलाजवळ करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व भावी आमदार उत्तमराव जानकर पांडुरंग तात्या वाघमोडे दिलीप तात्या होनमाणे, यांच्या समवेत अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळांचे पदाधिकारी लक्ष्मीकांत वाघे , संजय पाडोळे ,राहुल मोटे ,निलेश ठोंबरे , सुधाकर पोटे ,सुनील बापू पिसे ,तात्यासाहेब पोटे, ,सागर देवकाते ,सोमनाथ सरगर, सचिन सरगर ‘ महेश वगरे ,नागेश शिंदे, अमोल राजगे ,रुपेश पोटे ,देवीदास शिंदे, परशुराम माने, अमर गडदे, अजय गडदे, शिवाजी घोडके, आबासाहेब घुले पाटील, तानाजी घुले, तात्यासाहेब नायकुडे, जनार्दन नायकुडे डॉ तानाजी देवकाते व शेकडो समाज बांधवांन च्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनाची निवेदन प्रांत अधिकारी च्या वतीने मंडल अधिकारी चंद्रकांत भोसले व तलाठी शिंदे यांनी स्वीकारले.