मोफत निदान व उपचार शिबिरात ७२९ रुग्णांना लाभ
मोफत निदान व उपचार शिबिरात ७२९ रुग्णांना लाभ
अकलूज(संचार वृत्त सेवा)
पुण्यातील संचेती व अकलूजच्या अश्विनी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने येथे झालेल्या अस्थी रोग व मणके विकार मोफत निदान व उपचार शिबिरात ७२९ रुग्णांनी लाभ घेतला.
अकलूज येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.पराग संचेती म्हणाले की,स्वतःची प्रकृती चांगली असेल तरच आपण परिवाराची काळजी घेऊ शकतो,रोजच्या जीवनातही तज्ञ डाँक्टरांकडून वेळीच तपासण्या करून घेऊन, योग्य आहार घेत वजन नियंत्रीत ठेवल्यास गुडघे व मणक्यांचे दुखण्यापासून मुक्तता मिळु शकते.मात्र दुर्लक्ष करण्याने हे आजार बळावतात.
प्रास्ताविकात बोलताना डाँ.एम के इनामदार म्हणाले की कोणत्याही आजाराचे अचुक निदान झाले व वेळेवर उपचार केले तर पुढे त्रासदायक ठरत नाही. उपचार घेण्याची सर्वांची परिस्थिती नसते,अशा शिबीरातून उपचाराची संधी मिळते,त्याचा लाभ घेतला पाहिजे.संचेती हास्पिटलने ग्रामीण भागात हे शिबीर आयोजित करुन रुग्णसेवेचा वसा जोपासला असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना मणके विकार तज्ञ डाँ अभिनव भुसे म्हणाले घराघरात गुडघेदुखी व मणक्यांच्या आजाराचे रुग्ण आढळत आहेत.तरुण पिढीतही अस्थिरोग वाढत चालला आहे.व्यायामाचा अभाव,व्यवस्थित झोप न घेणे,आहारातील फास्टफुडचे प्रमाण यासाठी कारणीभुत आहे.प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा आरोग्य विमा उतरवणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी तहसील सुरेश शेजुळ,मणके विकार तज्ञ डाँ अभिनव भुसे,इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय सिद,सचिव डॉ निखिल मिसाळ,डॉ. रावसाहेब गुळवे आदी उपस्थित होते.
सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत चाललेल्या या शिबिरात संचेती हॉस्पिटलचे तज्ञ डाँ. पराग संचेती, डॉ.अभिनव भुसे, डॉ. प्रदिप बोद्रे,डाँ.अमीत वाकेकर,डॉ.जय चाकोरे,डॉ.अभिषेक वाळवी यांनी ७२९ रुग्णांच्या अस्थिरोग व मणक्याच्या आजारावरील तपासण्या करुन प्रथमोपचार व पुढील मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर पोफळे यांनी केले तर आभार डॉ.आनंद बस्ते यांनी मानले.