उघडेवाडी येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

उघडेवाडी येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीरास आजपासून सुरुवात.
संचारवृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथे शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे मोठ्या उत्साहात उद्घाटन वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आकाश शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर हे होते
उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतात आकाश शेळके म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वतःपेक्षा समाजाचा हिताचा अधिक विचार करावा हा संदेश दिला.अशा शिबीरातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत होते.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना डॉ. टिळेकर म्हणाले की,शिबिरामधून केवळ श्रमाचेच संस्कार होत नाहीत तर त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे मन समाजा प्रती अधिक संवेदनशील बनवणे आवश्यक आहे.समाजाच्या गरजा,समस्या कोणकोणत्या आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.यावेळी व्यासपीठावर उघडेवाडी गावचे सरपंच सौ. जिजाबाई गवळी,उपसरपंच सौ. अंजली सस्ते,माजी सरपंच पांडुरंग कदम,जेष्ठ नेते अजितसिंह माने-देशमुख, उद्योजक तानाजीराव जगदाळे, संग्रामसिंह सोसायटीचे चेअरमन रवींद्र काका घोरपडे,युवक नेते दीपक माने देशमुख,चेअरमन सयाजीराव उघडे,माजी सरपंच मोहन कचरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह माने देशमुख, मुख्याध्यापक रवींद्र क्षीरसागर,माजी उपसरपंच नितीन चौगुले,प्रा.धनंजय साठे, पोलीस पाटील सुहास गोडसे, डॉ.बाळासाहेब मुळीक, ज्युनिअर विभागाचे विभाग प्रमुख प्रा.अरविंद शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले प्रा. बलभीम काकूळे यानी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम अधिकारी डॉ.सज्जन पवार यांनी आभार मानले.हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. विजयकुमार शिंदे,प्रा.स्मिता पाटील,तानाजी बावळे,सौ.मिले मॅडम व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.