ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन भाग – दोन सेवारत्न सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी

ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन भाग-२ सेवारत्न श्री सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी – अकलुज ISO 9001 :2015
संचार वृत्त अपडेट
ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन भाग-१ मध्ये पाचट व्यवस्थापन वर आपन महिती घेतली . या लेखात खोडवा व्यवस्थापन बाबत महिती घेऊ या . एकूण ऊस क्षेत्रापैकी ३५ ते ४० % क्षेत्र खोडवा पिकाखाली आहे व उत्पादनात २५ ते ३० % हिस्सा खोडवा ऊसाचा आहे . खोडवा व्यवस्थापनात प्रमुख उद्देश सेंद्रीय पदार्थ (पाचट ) कल्चर करणे जमिनिची रासयनिक ‘ भौतीक ‘ जैविक गुणधर्म सुधारणा बरोबर आंतरपीक घेणे ऊस उत्पादन खर्च कमी कमी करणे व उपलब्ध साधन सामुग्रीच्या वापरासह उत्पादनात १० ते १५% वाढ करणे हा होय . खोडवा पीक घेतलेने जमिन पूर्वमशागत खर्च हेक्टरी १२ ते १५ हजार बचत होते . ऊस लागवड बेणे ‘ बीजप्रक्रिया ‘ ठिबक इत्यादी खर्चाची जवळपास १ ८ते २० हजार रुपये बचत होते . म्हणजेच एकूण ३० ते ३५ हजार रुपायाची बचत होऊन खर्च कमी उत्पादन वाढ व निव्वळ नफा वाढ होते . खोडवा प्रामुख्याने १५ फेब्रुवारी पर्यत तुटलेल्या अडसाली सुरु पूर्वहंगामी ऊसाचा ठेवावा पूर्वहंगामी ऊसाचा खोडवा चांगले उत्पादन देणेस उपयुक्त आहे. १५ फेब्रुवारी नंतर तुटलेल्या खोडवा ऊसाचे अपेक्षीत उत्पादन मिळत नाही . ऊस तुटून गेले नंतर कमी जास्त प्रमाणात ऊसाचे बुडके असतील ते जमिनीलगत तोडून घ्यावेत व ०१% बावीस्टीन फवारणी करावी म्हणजे बुडक्यावर बुरशी वाढत नाही . ऊस जर हार्वेस्टरने तोडला असेल तर पाचटाची कुट्टी झालेलीच असते जर तो मनुष्य शक्तीने तोडला असेल तर एकरी २६०० ते ३००० रु दराने क्षेत्रातील पाचट पाचट कुट्टी व पाचट मल्चरने कुटटी करून घ्यावे . व लेख क्रमांक १ मध्ये नमुद केल्याप्रमाणे पाचट प्रक्रिया करून घ्यावी . पाचट व्यवस्थापन प्रकिया नंतर बगला फोडून घ्यावेत व पाणी देणेत यावे पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसानी पाहारीचे सहयाने २२ से.मी खोल १० ते १५ से.मी बुडक्यापासून दुर एका बाजूला ३० सेमी अंतरावर युरिया १२५ किलो ५ .५ गोण्या ‘ ५७ किलो स्फुरद -७ गोण्या सिगल सुपर फॉस्फेट व ५७ किलो पालाश गोण्या म्युरेट ओफ पोटॅश व ३ पोती निबोळी पेंड याचे मिश्रण पाहारीचे सहय्याने देणेत यावे तदनंतर १३५ दिवसांनी सरीच्या विरुद्ध दिशेला २५० किलो नत्र -११ गोण्या युरिया ‘ ११५ किलो स्फुरद – १४ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट व ११५ पालाश – ४गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश देणेत यावे . माती परिक्षणात सुक्ष्म अनद्रव्ये कमतरता असेल तर चांगले कुजलेले १ टण शेणखत + २५ किलो फेरस सल्फेट + २५ किलो झिंक सल्फेट + २० किलो मॅगनीज सल्फेट + १० किलो बोरॅक्स यांचे मिश्रण करून बगला फोडणे अगोदर सरीत द्यावे कुठल्याही परिस्थितीत सुक्ष्म अनद्रव्ये रासयनिक खताबरोबर देऊ नयेत . पाचट व्यवस्थापन व रासायनिक खत व्यवस्थापन पाणी दिल्याने डोळे लवकर फुटतात उगवतात व त्यामुळे १ ते १.५ महिना लवकर पीक येते . उगवणीनंतर फुटण्याची संख्यां जास्त असलेमुळे गाळप ऊसाची संख्याही वाढते एकरी ४० हजार रोपे संख्या नसेल तर पिशवीत तयार केलेली १५ दिवस वयाची रोपे लावून तुटाळणी भरुण काढावी . प्रयोगाअंती निष्कर्षाचा विचार करता ज्या ऊसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन व १ लाख ऊस आहेत व को ८६०३२ व फुले २६५ सप्टेबर ते ऑक्टोबर महिन्यात तुटलेल्याच ऊसाचा खोडवा ठेवावा . या प्रमाणे जर खोडवा व पाचट व्यवस्थापन केले तर उत्पादन खर्चात बचत ‘ पाण्याचा ताण सहन करण्याची शक्तीत वाढ ‘ तणाचा बंदोबस्त ‘ आंतरपीक घेणेस सोईचे ‘ जमिनिचे भौतीक रासयनिक गुणधर्म सुधारणा होऊन पारंपारिक पद्धतीपेक्षा १३ ते१४ पाणी पाळ्या कमी लागून ऊसाचे वचन ११०ग्रॅम ने वाढून शर्करा २ .९% वाढते व याच बरोबर १५ टन प्रति हेक्टर उत्पादनात वाढ होऊन खर्चाची बचत निव्वळ उत्पन्नात वाढ होते . तरी या बाबीचा पद्धतीचा अवलंब करण्याचे व अधिक माहीतीसाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय, अधिकारी यांचेशी संपर्क करण्याचे अहवान मंडळ कृषि अधिकारी अकलुज कार्यालयाने केले आहे.