अकलूज ची लावणी स्पर्धा संयोजक दुसरी बाजू लक्षात घेतील ?

अकलूज ची लावणी स्पर्धा संयोजक दुसरी बाजू लक्षात घेतील ?
संचार वृत्त अपडेट
बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
अकलूजची लावणी स्पर्धा महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात नावलौकिक मिळवून गाजली आहे येथील शिस्त नियोजन कलावंताचे सादरीकरण व अकलूजला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामांकित कलावंतांनी घेतलेली मेहनत तयारी नव्या जुन्या बाजाची पारंपरिक लावणी व लावणी नृत्य या बाबत संदेह असण्याचे कारण नाही सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोह समितीचे देखणे नियोजन अफलातून असते महाराष्ट्राची शान लोककलेतील शृंगारिक साज विरह साहित्य प्रेम भावना मर्जी अध्यात्म संस्कृती यांचा मिलाफ असलेली लावणी मधल्या काही वर्षांत अडगळीत पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मराठी चित्रपटात तमाशा प्रधान काही लावण्या आल्या त्या गाजल्या ही पिंजरा सोंगाड्या एक गाव बारा भानगडी सुगंधी कट्टा सांगते ऐका अशा रंगल्या रात्री रंगपंचमी देवा तुझी सोन्याची जेजुरी या व अशा अनेक तमाशा प्रधान चित्रपटात लावणी गाजली अलीकडच्या काळात नटरंग चित्रपटात लावणी पुन्हा नव्या दमाने पहायला ऐकायला मिळाली या सर्व पार्श्वभूमीवर लोकाश्रय हरवलेल्या व अडगळीत जाऊ पहाणारी महाराष्ट्राची अस्सल पारंपरिक लावणी या कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी व या कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी व कलेला व ती सादर करणारे कलावंत यांना पुन्हा नव्याने गतवैभव मिळवून देण्यासाठी अकलूजचे मोहिते पाटील घराण्यातील एक सौंदर्य दृष्टिकोन व कलेचे चाहते असलेले जयसिंह ऊर्फ बाळदादा यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे जयंतीचे औचित्य साधून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोह समितीचे माध्यमातून अकलूजला राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा गेल्या तीस वर्षांपूर्वी सुरू केल्या या स्पर्धेचा बोलबाला व आयोजनाची दखल महाराष्ट्राने घेतली राज्यातील लोक साहित्याचे अभ्यासक समिक्षक लोक कलेचे रसिक जाणकार चित्रपट निर्माते मराठी हिंदीतील आघाडीचे कलावंतांनी अकलूजला सदर लावणी नृत्य स्पर्धा पहाण्यासाठी दरवर्षी हजेरी लावून दखल घेतली जसं आषाढी एकादशी ला न चुकता वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या ओढीनं दर्शनासाठी येतो तसे लोककलेचा व लावणी नृत्याचा आनंद घेण्यासाठी लावणी अभ्यासक रसिक व मोठ्या रथी महारथी यांची पाऊले अकलूजला वळू लागली आहेत ही झाली स्पर्धेची एक बाजू दुसरी बाजू अशी की जयंती समारोह समिती केवळ लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करुन थांबत नाही तर कलावंत गायक वादक उत्कृष्ट सादरीकरण करणार्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन गौरव करत असते काही कलावंतांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो वृद्ध कलावंत यांचा आरोग्य विमा उतरुन त्यांना सहकार्य केले जाते सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांडुरंगाच्या पावनभुमीने ओळखला जातो तर महाराष्ट्राची लोककलेची राणी असलेली राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेची ओळख राहिलेल्या अकलूजची ओळख झाली आहे या स्पर्धेची आगळी वेगळी महती व ख्याती अशी की अकलूजला लावणी स्पर्धेत सुरुवातीपासून सहभाग घेऊन सलग तीन वर्षे बक्षीस मिळवून नावाजलेल्या सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना राजश्री काळे नगरकर यांनी आपल्या मुलाला कलेक्टर केले आहे ही बाब ऐतिहासिक तर आहेच पण अकलूजची लावणी स्पर्धा कलावंतांना लोकाश्रय राजाश्रय मिळवून कसा सन्मान देते याचे हे उत्तम उदाहरण आहे अकलूजला होत असलेली लावणी नृत्य स्पर्धा संपूर्ण देशात साता समुद्रापार पोहचली परंतु माळशिरस तालुक्यातील असे अनेक रसिक चाहते सदर स्पर्धा इच्छा असूनही स्वतः चे गावांत ही लावणी पाहू शकत नाहीत या स्पर्धेची तिकीट दोन वर्ष अगोदर बुक होतात जे सधन प्रगतशील आहेत बांधकाम ठेकेदार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आमदार काही कंत्राटदार हे तिकीट बुकिंग सुरू होण्याची वाट पहातात ते त्वरित तिकीट उपलब्ध करून सदर स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात तेव्हा यावर ही स्पर्धा पहाण्याची इच्छा असूनही वंचित रहातात यांच्यासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोह समितीचे संयोजकांनी ही स्पर्धा स्मृती भवन या मर्यादेत सभागृहात न घेता अन्य ठिकाणी भव्य प्रांगणात कनात बांधून घेतली तर एका वेळी पन्नास हजार ते एक लाख रसिकांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल या परिसरात अशीही चर्चा आहे की अकलूजची लावणी नृत्य स्पर्धा ही दरवर्षी तेच अधिकारी तेच ठेकेदार तेच राजकीय नेते तेच ठराविक निमंत्रित सेलिब्रिटींची गर्दी त्यामुळे खरे लावणी रसिक ग्रामीण भागातील या कलेतील लहान कलाकार यांना या स्पर्धेचा आनंद घेता येत नाही यांवर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारोह समितीचे संयोजक काय निर्णय घेतात व पुढील वर्षीपासून काय बदल घडवून सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना आनंदाची पर्वणी देतात हे पहाणे औचित्याचा विषय आहे.