सदाशिवराव माने विद्यालयाच्या यास्मिन शेख यांना ‘आदर्श विज्ञान शिक्षक ‘ पुरस्कार

सदाशिवराव माने विद्यालयाच्या यास्मिन शेख यांना'आदर्श विज्ञान शिक्षक' पुरस्काराने सन्मानित
(अकलूज)- येथील शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या विज्ञाननिष्ठ शिक्षिका यास्मीन फारूक शेख यांना नुकताच महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळ संलग्नित सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ च्या वतीने ,लोकमंगल कॉलेज वडाळा या ठिकाणी २०२४-२५ सालचा `आदर्श विज्ञान शिक्षक` पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या सन २०१० पासून विज्ञान विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या विद्यालयात विज्ञान विभाग प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. यांनी विज्ञान प्राविण्य प्रज्ञा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिॅम्पियाड सामान्य ज्ञान परीक्षा या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना उज्वल यश मिळवून दिले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत निवडले गेले आहेत. तसेच त्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन यामध्ये देखील उल्लेखनीय काम केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या अनेक उपकरणांनी निवड तालुका, जिल्हा व राज्यस्तरापर्यंत झाली आहे.
त्यांना शि. प्र. मंडळ अकलूज संस्थेचे मार्गदर्शक संचालक.जयसिंह शंकराराव मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, स्थानिक प्रशाला समितीचे सदस्य, मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक, विज्ञान शिक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांना उज्वल कार्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.