solapur

खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचा बाधितांना दिलासा तर सतत धार पावसाने बाजारपेठेत शुकशुकाट

खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचा बाधितांना दिलासा तर सतत धार पावसाने बाजारपेठेत शुकशुकाट

अकलूज येथील क्रीडा संकुल ला आले तळ्याचे स्वरूप

संचार वृत्त अपडेट 

अकलूज शहरात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच. ओढ्याना पाणी आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले.
अकलूज शहर व परिसरात शुक्रवारी दिवसभर वादळी वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरूच होती, कधी मुसळधार तर कधी संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शनिवारी पहाटे मोठ्या मुसळधार पावसाने झोडपले सुरुवातीला मुसळधार व नंतर रिमरिम पाऊस झाला होता. त्यानंतर रात्रभर अधूनमधून कमी-अधिक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तालुक्यातील गिरझणी ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते तर आनंदनगर येथील ओढ्यास पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद होती घुमेरा ओढ्याला मोठा पूर आल्याने अकलूज सांगोला वाहतूक बंद होती ती पंढरपूर मार्गे वळवण्यात आली शेंड्या चिंच येथील वेळापूर मार्गावरील ओढ्यास पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद होती तर सदाशिवनगर येथील झोपडपट्टी मध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ झाली खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील ,सरपंच व कार्यकर्ते यांनी तातडीने मदत करून जेसीपी ने पाणी काढून देऊन नागरिकांना दिलासा दिला या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.

आनंद नगर येथील ओढ्याच्या पुलावरून पाणी

अकलूज येथील क्रीडा संकुल मध्ये पाण्याचे तळे साठले आहे तर कॉलेजच्या पाठीमागील वस्तीमध्ये ओड्याचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले तत्पूर्वी मोठ्या पावसाची कल्पना देण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व शिवतेज मोहिते पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या ओडा रुंदीकरण व खोलीकरण करून घेतला त्यामुळे मोठी हानी टळली आहे. .दिवसभराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांना वारंवार एफएम रेडिओवरून सतर्क राहण्याच्या सूचना व कामाशिवाय बाहेर पडू नका अशा सूचना पोलीस व प्रशासनाकडून दिल्या जात होत्या त्यामुळे अकलूज बाजारपेठेत शुकशुकाट होता ग्राहक बाजारात नसल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सुट्टी घेतलीं नागरी वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असल्याने रस्ते उघडले गेले आहेत यामुळेनागरिकांचे फारच हाल होत आहेत. या पावसाळी वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात दररोज पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button