साखरेच्या दरात झालेली वाढ पाहता कारखान्यांनी ऊस बिलाचा दुसरा हप्ता तात्काळ द्यावा तालुक्याच्या बाहेरील कारखान्याच्या दरात ५०० ते ६०० रु. जादा दर ; अजित बोरकर

साखरेच्या दरात झालेली वाढ पाहता कारखान्यांनी ऊस बिलाचा दुसरा हप्ता तात्काळ द्यावा तालुक्याच्या बाहेरील कारखान्याच्या दरात ५०० ते ६०० रु. जादा दर ; अजित बोरकर
संचार वृत्त अपडेट
साखरेला बाजारात सध्या वाढीव भाव मिळत असून किरकोळ बाजारात साखरेचे दर किलोमागे ४५ रुपयापर्यंत गेले आहेत आगामी काळात दिवाळीपर्यंसाखरेलाला 50 रुपये प्रति किलो दर मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी साखर कारखानदारांनी दुसऱ्या हप्त्याच्या रूपाने किमान पाचशे रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी केली
.बोरकर म्हणाले की मागील वर्षी गळीत झालेल्या उसाला प्रति टन २८००,२९०० सरासरी प्रमाणे शेतकऱ्यांना दिले गेले त्यावेळी साखरेला किलोमागे 35 रुपये भाव होता परंतु सध्या त्याच साखरेचे किलोमागे ४५ रुपयांचा दर मिळत आहे भावात झालेली ही वाढ लक्षात घेता शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रतिटन ८००ते १००० रुपये मिळणे अपेक्षित आहे तरी देखील आम्ही फक्त पाचशे रुपयांची मागणी करत आहोत शेतकरी दिवस रात्र कष्ट करून ऊस पिकवतात शेतासाठी लागणारे बी बियाणे खते मजुरी सिंचन कीटकनाशके इंधन यासाठी प्रचंड खर्च करावा लागतो सध्या नवीन हंगामाच्या कामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे तरीसुद्धा कारखानदार शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे देण्यास तयार नाहीत ही दुर्दैवी बाब आहे साखरेला भरघोस दर मिळत असूनही कारखानदार शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देत नाहीत तालुक्याच्या बाहेरील कारखान्यांचा दर पाहता ५०० ते ६०० रुपयांचा जादा दर मिळत आहे याचाही विचार साखर कारखानदारांनी करावा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा उत्सव असलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गणरायाला प्रार्थना करतो की शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मोबदला देण्याची सद्बुद्धी कारखानदारांना द्यावी अशी भावनिक साद त्यांनी गणरायाकडे घातली आहे.