विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण संपन्न

विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण संपन्न
संचार वृत्त अपडेट
जि.प.प्रा. शाळा बिजवडी (रावबहादूर गट) येथे विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने लिंबू चमचा शर्यत, संगीत खुर्ची स्पर्धा, प्रश्नमंजुषा, कौन बनेगा ज्ञानपती,अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना
विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, उपाध्यक्ष सनी बंडलकर, खजिनदार मारुती चव्हाण,
सुमित ढोबळे,प्रतीक जाधव,शिवराम मदने, शंभुराज जाधव, यशसूर सोहेल नदाफ, अमित ढोबळे, उपसरपंच दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.
शालेय साहित्याचे वाटप दुरेघी वही,पेन,पेन्शन, रंगपेटी, कंपास,पेटीतील साहित्य, वाटप करण्यात आले यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज शिंदे,पिंटू मदने, अंगणवाडी सेविका सारिका चव्हाण, गिरजा गेजगे इ. मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन अजमेर फकीर यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी मानले.