घायल हू इसलिये घातक हू! धुरंदरमधील डायलॉग मारत धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

घायल हू इसलिये घातक हू! धुरंदरमधील डायलॉग मारत धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठा विजय मिळवला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात अकलूज नगरपालिकेची निवडणूक लढवण्यात आली होती.
या विजयानंतर बोलताना खासदार धैर्य़शील मोहिते पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला. घायल हू इसलिये घातक हू असे म्हणत धुरंदर चित्रपटातल्या या गाजलेल्या डायलॉगचा उच्चार करत भाजपवर टीका केली. निवडणुकीच्या काळात भाजपकडून विशेषत: माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती आज नगरपरिषदेच्या मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विजय मिळवल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं
सोलापूर जिल्ह्यात भाजपची वाताहत झाल्याचा संदर्भ देत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. अकलूज नगरपालिकेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर तुफानी टोलेबाजी केली. भाजपचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ,मंगळवेढा ,अकलूज, करमाळा, कुर्डूवाडी आणि सांगोला अशा सहा ठिकाणी भाजपचा दणदणीन पराभव झाला आहे. याचाच संदर्भ घेत सोलापूर जिल्हा हा स्वाभिमानी आहे, कोणाची हुकूमशाही चालवू देत नाही आणि त्यामुळेच लोकसभा विधानसभा आणि आता नगरपालिकेत सलग तिसऱ्यांदा भाजपाला सणकून दणका दिला असल्याची आठवण धैर्यशील मोहिते पाटील यांनी करुन दिली आहे.
अकलूज नगर परिषदेच्या 13 प्रभागांमध्ये 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 20 उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपचे ४ उमेदवार निवडून आले आहेत उबाटा गटाचे २ उमेदवार निवडून आले.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा आडगळे 2 हजार 793 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या पूजा कोथमीरे यांचा पराभव झालेला आहे. अकलूज नगर पालिकेच्या निवडणुकीची राज्यभर चर्चा होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार की भाजप त्यांचा पराभव करणार? मात्र, अखेर मोहिते पाटील यांनी या ठिकाणी सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे. या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.



