महर्षी संकुलात सर्प समज गैरसमज कार्यशाळा संपन्न
सापांविषयी निराधार कपोल कल्पित अंधश्रद्धांना दूर करण्यासाठी महर्षि संकुलात सर्प समज गैरसमज कार्यशाळा संपन्न
संचार वृत्त
————————————————-
अकलूज (प्रतिनिधी)महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंत नगर येथे नागपंचमी निमित्त सर्प समज गैरसमज या विषयावर कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा कमी होऊन सापांविषयी मनातील भीती दूर व्हावी हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याता म्हणून प्राध्यापक डॉक्टर धनंजय देशमुख उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी सापाचे पर्यावरणाच्या दृष्टीने असणारे महत्त्व प्रतिपादन केले. जगामध्ये सुमारे 2700 प्रकारचे साप आढळत असून त्यांचे वर्गीकरण विषारी, निम विषारी व बिनविषारी असे केले जाते. प्राध्यापक देशमुख यांनी नाग ,मण्यार, घोणस ,फुरसे हरणटोळ, मांजरा अशा अनेक प्रकारच्या सापांची माहिती डिजिटल बॅनरच्या साह्याने कथन केली. यावेळी अकलूज परिसरात सापडलेला मांडूळ जातीचा साप विद्यार्थ्यांना दाखवून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आला. सापाविषयी मनातील भीती दूर व्हावी यासाठी अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले. सापदूध पितो, सापडूक धरतो या अंधश्रद्धांना जरब बसवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमासाठी उप मुख्याध्यापक भारत चंदनकर ,गुलाब कोठावळे भाग्यश्री उरवणे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू यांनी केले तर आभार नामदेव कुंभार यांनी मानले.