अकलूज येथे अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन,स्मृतींना उजाळा

अकलूज येथे अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन, स्मृतींना उजाळा
संचार वृत्त अपडेट
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी
वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त अकलूज येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.भारतीय जनता पक्षाचे अकलूज नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक व मान्यवरांनी कार्यक्रमात श्रद्धेय अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी नगरसेवक महेश शिंदे,राहुल लोंढे, दिपाली बनसोडे, जयश्री एकतपुरे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्यामसुंदर भागवत,संध्या भागवत, अभिजीत भागवत,संतोष वाघमोडे,संजय एकतपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संकेत जाधव यांनी परिश्रम घेतले तर महेश शिंदे यांनी आभार व्यक्त केले.श्यामसुंदर भागवत यांनी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन चरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले अटलजी हे केवळ राजकारणी नव्हते.तर ते संवेदनशील कवी, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या भावना जाणणारे लोकनेते होते. पक्षनिष्ठा राखत देश हित सर्वोच्च मानणारे त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठी आहेत असे ते म्हणाले.
अटलजींच्या प्रेरणेने भविष्यात अकलूज मध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आव्हान नगरसेवक राहुल लोंढे यांनी केले तर पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देत अटलजींच्या आदर्शावर काम करण्याचा संकल्प दिपाली वाघमोडे व जयश्री एकतपूरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमातून अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार कार्य आणि राष्ट्रप्रेम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.
‘अंधेरा मिटेगा,सुरज निकलेगा कमल खिलेगा’
यावेळी भागवत यांनी 6 एप्रिल 1980 रोजी अटलजीं केलेली ऐतिहासिक भविष्यवाणीची आठवण करून दिली ‘इस पश्चिमी तटपर, डूबते हुए सुरज को साक्षी मानकर,मै भविष्यवाणी करणे ज्या रहा हु ‘अंधेरा मिटेगा, सुरज निकलेगा कमल खिलेगा’ या शब्दाचे आज भाजपच्या वाटचालीची प्रचिती येत असल्याचे त्यांनी सांगितले.



