भीती वाटते मुलगी म्हणून जगताना… बदलणारा महाराष्ट्र बघताना…
मी पण एक मुलगीच आहे…!!!
————————————–
- संचार वृत्त
भीती वाटते मुलगी म्हणून जगताना… बदलणारा महाराष्ट्र बघताना…
इथे दिवसाढवळ्या माझ्यावरती हल्ला होतं असतो पण वाचवायला मात्र कुणीच पुढे नसतो…
पहात राहतात लोक मला तडफडून मरताना… पण दिसत नाही कोणीच मदतीचा हात धरताना…
कसं जगायचं या महाराष्ट्रामध्ये जर नसेल सुरक्षित मी…. याचा कधीच विचार करत नाही कोणी…
मुलगी म्हणून जन्माला येण वाटतं तेवढं सोपं नसतं शेवटी ज्याच त्यालाच समजत असतं…!!
इथे दररोज तोंड बांधून फिरावं लागतं प्रत्येक वेळी त्याचं कारण फक्त ऊनच नसतं…!!
भीती वाटते मला पण या वाईट जगाची… कारण इथे लाज नाही कोणालाच कोणाची….
दररोज बातमीमध्ये माझं नाव असतं…जग पण नेहमी माझीच चूक काढत असतं…
का विचार करत नाही कोणी माझ्या बाजूने मी पण एक मुलगीच आहे नाही कोणी वैरी…
कुटुंबाला सांभाळणारी ही मीच..
संसार सावरणारी ही मीच.. मुलांना घडवणारी ही मीच.. प्रत्येकाच्या सुखदुःखाला समजून घेणारी देखील मीच…
एवढ्या सगळ्या भूमिका पार पाडूनही मीच कुठेतरी कमी पडते…!! मुलगी म्हणून जन्माला आले कदाचित इथेच तर चुकते..!!!
सगळ्या संकटांना सावरून शेवटी माझी मलाच उठायचं आहे मुलगी म्हणून जन्माला आले याचा मला नेहमी अभिमान आहे…!!
प्रेरणा विकास गायकवाड
बी काॅम भाग १
शंकरराव मोहिते महाविद्यालयात
अकलूज