solapur
अकलूज नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
अकलूज नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
संचार वृत्त
अकलूज येथील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवे दनाद्वारे केली आहे या निवेदनात जुनी ग्रामपंचायत, हनुमान मंदिरा च्या परिसरात दहा ते पंधरा कुत्र्यांचा समूह रात्री अपरात्री फिरत असून त्यात काही पिसाळलेले कुत्री आहेत तर काही कुत्र्यांच्या डोक्यातून रक्त गळत आहे घरात घुसण्याचा प्रयत्नही कुत्री करत आहेत. लहान मुलांना व वृद्धांना चावण्याचा धोका निर्माण झाला असून दहशत निर्माण झाली आहे. असे निवेदनात म्हटले आहे नगर परिषद प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातून जोर धरू लागलीआहे.