जो पक्ष जाहीरनाम्यात कामगारांच्या मागण्या घेईल त्या पक्षाला शेती महामंडळ कामगार मतदान करतील; सुभाष कुलकर्णी
जो राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या जाहीरनाम्यात घेईल त्या पक्षाला शेती महामंडळ कामगार मतदान करतील; कामगार नेते सुभाष कुलकर्णी
श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)
महाराष्ट्रातील शेती महामंडळाच्या चौदा ऊस मळ्यातील शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या जो राजकीय पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात घेईल त्या पक्षाला शेती महामंडळाचे कामगार मतदान करतील अशी जाहीर भूमिका शेती महामंडळ कामगार लढाऊ कृती समितीचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांनी मांडली आहे आज श्रीपूर मध्ये शेती महामंडळाच्या कामगारांचा मेळावा दत्त मंदिर येथे घेण्यात आला त्यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना कुलकर्णी बोलत होते ते पुढे म्हणाले की कामगारांना रहायला दोन गुंठे जागा पेन्शन वाढ भविष्य निर्वाह निधी व इतर महत्वाचे प्रश्न गेली पस्तीस वर्षं मांडत आलो आहे यासंदर्भात मोर्चे धरणे आंदोलन निवेदन दिली अनेक वेळा आश्वासन मिळाली पण प्रश्न सोडवले नाहीत अनेक कामगार वयोवृद्ध झाले आहेत काही निवर्तले आहेत पण प्रश्न सरकार सोडवत नाही शिर्डी येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी चौदा ऊस मळ्यातील कामगारांचा भव्य मोर्चा काढला होता कामगारांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक लाऊ असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले होते पण मिटिंग लावली नाही जागेचा प्रश्न सोडवला जात नाही त्यामुळे येत्या तेवीस सप्टेंबर रोजी पुण्यात विभागीय कार्यालयावर कामगारांचा भव्य मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली कामगारांच्या न्याय मागण्यासाठी काही विषयांवर न्यायालयात व उच्च न्यायालयात केसेस दाखल केल्या आहेत खालच्या न्यायालयात कामगारांच्या बाजूने निकाल लागला आहे पण सरकारनं उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे शेती महामंडळाच्या कामगारांना किमान तीनं हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी सरकारकडे आग्रही मागणी आहे या मेळाव्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रदेश युवक उपाध्यक्ष किरण धाईंजे आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी ओबीसी अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष अरुण तोडकर रिपब्लिकन शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र भोसले पेन्शनर संघटना राज्य उपाध्यक्ष दळवी मेळाव्याचे अध्यक्ष विठ्ठल गेजगे राष्ट्रीय साखर कामगार संघ माळशिरस तालुका शेती महामंडळ युनिट सेक्रेटरी भालचंद्र शिंदे पाटील गौतम आठवले गुडुलाल शेख अनिल दळवी राजू शेंडगे जांबूड ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र भोसले बबन उबाळे मधुकर शेंडगे भारत कांबळे राणू शिरगिरे आबा कांबळे विष्णु भोंगळे प्रकाश कवडे बापू साठे महिला प्रतिनिधी कविता तोरणे शांता बोडरे तसेच श्रीपूर ऊस मळ्यातील लवंग जांबूड डी एकोणीस मायनर महाळुंग चौकी सदाशिवनगर फलटण साखरवाडी वालचंदनगर परिसरातील शेती महामंडळ कामगार महिला कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या यावेळी आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांनी सांगितले की कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआय आठवले गट तुमच्या पाठीशी आहे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन मोर्चा सभा निषेध या साठी आम्ही रस्त्यावर येऊ महसूल मंत्री मुख्यमंत्री यांना जाब विचारला जाईल यावेळी ज्येष्ठ नेते शामराव भोसले यांनीही आपले विचार मांडले अनेक कामगारांचे म्हणणे आहे की आम्हाला रहायला दोन गुंठे जागा पेन्शन वाढ व भविष्यनिर्वाह निधी मिळावा कार्यक्रमाचे संयोजक भालचंद्र शिंदे पाटील यांनी या भागातील कामगारांचे प्रश्न मांडले त्यांना न्याय देण्यासाठी लढा कृती समिती नेते सुभाष कुलकर्णी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे आवाहन केले मेळावा यशस्वी करण्यासाठी चांगदेव कसबे शंकर मोरे आबा कांबळे राणू शिरगिरे नितीन लावंड यांनी सहकार्य केले