छ.शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावेत डाँ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील
छ.शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावेत डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील.
मराठा सेवा संघाचा मराठा भूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
छ.शिवाजी महाराज यांनी जीवनात महिलांना माता व भगिनीचे स्थान दिले.त्यांचे कार्यकर्तुत्व नव्या पिढीला ज्ञात होणे गरजेचे असुन त्यांच्या चारित्र्याची आजच्या पिढीला माहिती दिल्यास महिलांवरील लैंगिक अत्याचार घडणार नाहीत असे विचार मराठा भुषण पुरस्कार प्राप्त डॉ स्वंयप्रभादेवी मोहिते पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
माळशिरस तालुका मराठा सेवा संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा मराठा भुषण पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले.डाॅ. स्वंयप्रभादेवी मोहिते पाटील (सामाजिक),डॉ राजीव राणे (वैद्यकीय),ॲड प्रकाशराव पाटील (विधी),मल्ल सम्राट पै.रावसाहेब मगर (क्रिडा),प्रा.उत्तम साव़ंत (शिक्षण),संजय पवार (प्रसिद्धी माध्यम), अजित पराडे (कृषी) यांच्यासह नवनिर्वाचित संसद सदस्य खा.धैर्यशील मोहिते पाटील व राज्य शासन शाहिरी पुरस्कार प्राप्त शाहिर राजेंद्र कांबळे यांना सन्मान चिन्ह,फेट, शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील,उत्तमराव माने,अमित निमकर,उपसंचालक अनिल माने,सुनीता पाटील,मनोज राऊत,तालुका वैद्यकीय अधिकारी प्रियंका शिंदे,अनिल माने,आक्काताई माने,प्रियंका नागणे,प्रा.मिनाक्षी जगदाळे, मनोरमा लावंड,वनिता कोरटकर,निनाद पाटील,डॉ. अमोल माने,राजेंद्र मिसाळ, नवनाथ नागणे,बाळासाहेब पराडे, दिगांबर मिसाळ,सचिन मिसाळ, यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी नेटसेट ते माध्यमिक शालांत परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व शासकीय नोकरीत नियुक्त झालेल्यांचा सन्मान करण्यात आला. महामानवांच्या जयंती निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन युवक महिलांसाठी उच्चपदस्थ शासकीय अधिकारी यांना निमंत्रीत करुन त्यांचे मार्गदर्शन शिबीर घेतल्यास समाजाला नवी दिशा मिळेल असे असे यावेळी नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले तर शाहीर राजेंद्र कांबळेंनी माळशिरस तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्याचे काम सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी केले.विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणुन कलाकार,कलावंतांना मानधन देऊन जगण्याचा आधार दिला असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुहास उरवणे प्रास्ताविक निनाद पाटील तर आभार दिगंबर मिसाळ यांनी मानले.
——————————————
मराठा सेवा संघाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे कविटकर यांना सपत्नीक देताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,खा.धैर्यशील मोहिते पाटील,मदनसिंह मोहिते पाटील, डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील,उत्तमराव माने, अक्काताई माने,रवींद्र पवार आदी मान्यवर (छाया:-केदार लोहकरे,अकलूज)