बजरंग भोसले यांच्या घरी महालक्ष्मी गौरीचे आगमन
बजरंग रमेश भोसले यांच्या घरी महालक्ष्मी गौरींचे आगमन
गौरीची आरास मध्ये शिवतेज सिंह मोहिते पाटील हे फिक्स आमदार असलेल्या दोन प्रतिमा ठेवल्या आहेत
श्रीपूर (प्रतिनिधी)
श्रीपूर येथील मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे बजरंग रमेश भोसले यांच्या घरी आज महालक्ष्मी गौरींचे आगमन झाले आहे त्यांनी गौरी गणपती समोर जी आकर्षक सजावट व आरास केली आहे त्या मध्ये गौरी समोर अकलूजचे शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची प्रतिमा ठेवल्या आहेत त्यावर लिहिले आहे बदल हवा आमदार नवा फिक्स आमदार आपले शिवबाबा भोसले यांनी आपल्या नेत्यांच्या प्रती असलेली निष्ठा प्रेम व आपला नेता आमदार व्हावा म्हणून ज्या दोन प्रतिमा ठेवल्या आहेत त्याची चर्चा श्रीपूर परिसरात होत आहे कार्यकर्त्यांचे प्रेम आपल्या नेत्यांवर किती असू शकते याचं हे दुर्मिळ उदाहरण आहे सदर दृश्य पहाण्यासाठी महिला कार्यकर्ते यांची उत्सुकता वाढली आहे बजरंग भोसले हे श्रीपूर पंचक्रोशीतील एक तरुण तडफदार व धडाडीचे युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात शिवजयंती धार्मिक कार्यक्रम सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग मोठा आहे.