अकलूज येथे श्री गणपती मंदिरात अथर्वशीर्षाचे सहस्त्र आवर्तन अभिषेक संपन्न
अकलूज येथील श्री.गणपती मंदिरात अथर्वशीर्षाचे सहस्र आवर्तन अभिषेक संपन्न.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
येथील ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून अथर्वशीर्षाचा सहस्र आवर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अकलूज येथील पेशवे कालीन पुरातन गणेश मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित ब्रह्मवृंदाने अथर्वशीर्षाचे सहस्र आवर्तन पठन केले.
या कार्यक्रमासाठी जयसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह मानेपाटील,धनंजय देशमुख,डाॅ.अभिजीत बडवे, डाॅ.कांचन कुलकर्णी,उदय टेके, शंकरराव देशपांडे,जगन्नाथ अनगळ,सुरेश देशपांडे,ॲड. प्रमोद कुलकर्णी,उद्योजक ज्ञानेश कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित भक्तांना ट्रस्टच्या वतीने दूध,केळी व मोदकाचा प्रसाद देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष देशपांडे,उपाध्यक्ष हरिकाका कुलकर्णी,प्रसाद कुलकर्णी,श्रीधर कुलकर्णी, प्रेमनाथ रामदासी,वैभव आंबेकर,विनायक फडणीस, गणेश कुलकर्णी,संतोष मुदगल , प्रमोद इनामदार,प्रसाद भागवत, नितीन रामदासी,मनोज देशपांडे, अवधूत शेकदार,जयेश कुलकर्णी,महेंद्र जोशी,गणेश बनाळीकर,संतोष अनगळ,राहूल भागवत आदींनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी वैशाली कांडलकर, वैशाली कुलकर्णी,सुप्रिया मुदगल,श्रेया कुलकर्णी,मेघा कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
अकलूज येथील पुरातन गणेश मंदिर हे पेशवेकालीन मंदिर असून अकलूजमधील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे.नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची धारणा असल्याने इथे भक्तांची सतत दर्शनासाठी गर्दी असते.सध्या या मंदिराचा सभामंडप जीर्ण झाल्याने त्याचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे.लोक वर्गणीतून हे काम पुर्ण करावे.त्यासाठी लागले ते सहकार्य करण्यात येईल.
जयसिंह मोहिते-पाटील
चेअरमन,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर अकलूज