महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोलापुरातून महेंद्र गायकवाड,शुभम माने यांची निवड

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सोलापुरातून महेंद्र गायकवाड,शुभम माने यांची निवड.
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
सोलापूर जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत माती विभागात मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड तर गादी विभागात माळशिरसचा शुभम माने हे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत येथे २६ मार्च ते ३० मार्च २०२५ या कालावधीत ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे.यासाठी सोलापूर जिल्हा तालीम संघ आयोजित व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथील धवल श्रीराम मंदिर येथे चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ सोलापूर तालीम संघाचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तालीम संघाचे महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेले महेंद्र गायकवाड आणि शुभम माने यांच्या समवेत धवलसिंह मोहिते-पाटील,माजी आमदार राम सातपुते,चंद्रहार पाटील आदी.उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, रावसाहेब (छोटा) मगर,मारुती वाकडे,महादेव भंडारे,महादेव ठवरे,प्रताप झंजे,वामन उबाळे, भारत मेकाले,विलास कंडरे, अभिमन्यू डमरे,भारत भोसले, केदार साखरे,नरसिंह कुलकर्णी, सचिन भोपळे,ज्ञानदेव पालवे, अण्णासाहेब शिंदे,सुदर्शन मिसाळ,अण्णासाहेब इनामदार, सुदर्शन मिसाळ,नवनाथ साठे, नारायण माने,मयूर माने,संग्राम भोसले,मोहन नगरे उपस्थित होते.
या निवड चाचणी स्पर्धेतील खुल्या गटात अंतिम लढत माती विभाग महेंद्र गायकवाड (मंगळवेढा) विरुद्ध आदित्य कोकाटे (माळशिरस) यांच्यात झाली.या कुस्तीत महेंद्र गायकवाड विजेता ठरला.गादी विभागात अंतिम कुस्ती शुभम माने (माळशिरस) विरुध्द आदित्य गवसणे (अकलूज) यांच्यात झाली.यात शुभम माने विजेता ठरला.विजेत्यांना माजी आमदार राम सातपुते,डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
गादी विभागातील विजेते–
५७ किलो वैभव यळगुंडे (सोलापूर),६१ किलो करण माने (पंढरपूर),६५ किलो ज्योतिबा अटकळे (पंढरपूर),७० किलो किरण संत्रे (पंढरपूर),७४ किलो विकास करे (माळशिरस),७९ किलो शुभम मगर (माळशिरस), ८६ किलो रोहित निटवे (माळशिरस),२२ किलो शिवराज डोंबाळे (माळशिरस),२७ किलो शंकर बंडगर (माढा).
माती विभागातील विजेते— ५७ किलो विशाल सुरवसे (माढा),६१ किलो अजय भुसनर (माळशिरस),६५ किलो अनिकेत मगर (माळशिरस),७० किलो ऋषिकेश पवार (पंढरपूर),७४ किलो तुषार झंजे (माळशिरस), ७९ किलो प्रणव हांडे (माळशिरस),८६ किलो बिरुदेव बनसोडे (मोहोळ),९२ किलो अर्जुन काळे (करमाळा),२७ किलो श्रीनिवास पाथरूठ (मोहोळ).
पंच म्हणून रवी बोत्रे, बाळू मेटकरी,अक्षय टिळेकर,धनराज भुजबळ,बापू लोखंडे,राजेंद्र कणसे,सचिन ऐवळे,प्रकाश घोरपडे,गणेश मगदूम यांनी काम पाहिले.निवेदन युवराज केचे व हणमंत शेंडगे यांनी केले.