एक हाथ लाकूड,नऊ हाथ ढलपी,,!काढण्याची सवय असलेला धूर्त लांडग्याची शिकार आम्हीच करणार,,!
एक हाथ लाकूड ,,, नऊ हाथ ढलपी,,,! काढण्याची सवय असलेला धूर्त लांडग्याची शिकार आम्हीच करणार,,,,,,!
ऍड अविनाश टी. काले
मो न 9960178213
मला सत्तेची हाव नाही, पैश्याची हाव नाही, माझा लढा हा मोहिते पाटील यांच्या गुलामगिरीतून माळशिरस तालुका मुक्त करणे आहे त्यांच्या प्रति माझ्या मनात इतका राग भरलेला आहे की त्या शक्तीला उखडून फेकण्यासाठी मी जात ही बदलली अशी विद्रोहाची व संघर्षाची भूमिका घेऊन सर्व सामान्य असलेले उत्तमराव जानकर राजकारणात निवडणुका लढवत राहिले प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी हातात कायदे घेतले , पाय मोडून काढू , नाद करायचा नाही , अशी आक्रमक भाषा गाव खेडूत यांच्या समोर वापरली , आणि याचा परिणाम म्हणून ऍड सुभाष अण्णा पाटील , ऍड आ राम हरी रुपनवर सारखी कायद्याची जाणकार नेतृत्व मागे पडली आणि उत्तमराव जानकर यांचा राजकारणात उदय झाला राजकीय यशाचे गमक त्यांना सापडले ते होते मोठे बोलण्याचे, त्या शिवाय आपले राजकारण पुढे सरकत नाही हे त्यांनी हेरले.
ऐतिहासिक कालखंडा पासून चालत आलेला धनगर मराठा संघर्ष यात ते धनगर समाजाचे नेते बनले*
*मोहिते पाटील विरोधक म्हणून अस्तित्वात असलेल्या इतर मराठा नेत्यांना ही त्यांनी आपल्या कच्छपी लावले
माळशिरस तालुक्यातील इतर सर्व जाती समूहातील नेत्यांना याच कारणाने त्यांनी मोहित केले , त्या आधारे राज्यातील सर्व पक्षीय नेतृत्व त्यांच्या कह्यात आले*
सोलापूर जिल्ह्यातील समविचारी आघाडी चां ही ते घटक झाले ही आघाडी मोहिते पाटील यांच्या विरोधातील आघाडी होती लोकसभा निवडणुकीत त्यांचे सहकारी राहिलेल्या आ संजय मामा शिंदे यांचेशी कोणत्या कारणाने गद्दारी केली हे त्यांनाच माहीत?
*पण ते कारण आम्हाला ही माहीत आहे , संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या निवडणुकीची सूत्रे सुरेश आबा पालवे यांच्या हातात दिली आपल्या शिवाय धनगर समाजात दुसरे कोणतेही नेतृत्व उभे राहू नये हीच भावना त्या मागे होती हा त्यांचा राग इतका प्रबळ होता की भाजपा मध्ये मोहिते पाटील गेल्या नंतर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसेन पण संजय मामा यांना विरोध हा करणारच या एकाच भूमिकेतून त्यांनी माजी खा रणजितसिंह निंबाळकर यांना समर्थन दिले
अजित दादा यांनी त्याच सुरेश आबा पालवे यांना जिल्हा नियोजन समिती सदस्य बनवले
*तर भाजप ने त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र के के पाटील यांना ही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बनवले*
*या रागाचा कडेलोट होत असतानाच आपणास सोलापूर लोकसभा राखीव उमेदवारी मिळेल ही त्यांची आशा फोल ठरली . आणि ती उमेदवारी आ राम सातपुते यांना प्राप्त झाली भाजपा आपल्याला उमेदवारी देत नाही , राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना विधान परिषद देत नाही राग तर सार्वत्रिक होता , यातून ते भाजप वर प्रचंड नाराज झाले*
मी माझ्या 10वर्षाच्या राजकीय कारकीर्दीचा हिशोब मागत आहे असा बहाणा करून देवेंद्र जी फडणवीस साहेब यांना त्यांनी चकवा मारला देवेंद्र जी फडणवीस यांचे कडे त्यांना घेऊन जाणारे त्यांचे च घनिष्ठ मित्र होते ज्यात सांगोला चे आमदार शहाजी बापू पाटील होते , माण चे आ जयकुमार गोरे होते , आणि दस्तुरखुद्द तत्कालीन खा रणजितसिंह निंबाळकर हे ही होते.
पण तत्कालीन लोक माणसाची हवा जाणून आपल्या जहाजाचे शिड बांधून तयार असणाऱ्या उत्तमराव जानकर यांची नजर तीन चार महिन्यात माळशिरस तालुका राखीव मतदार संघावर होती.आपली निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक जुळवाजुळव करू पाहणाऱ्या मोहिते पाटील यांच्या साठी आजवर त्यांचा कट्टर राजकीय वैरी संकटमोचक म्हणून थेट जाऊन भिडला होता आपली वैचारिक भूमिका काय होती? आपल्या पाठीशी उभे राहिलेले समर्थक यांना काय वाटेल? याची फिकीर थोडीच त्यांना होती?
आपण कांहीं ही सांगितले तरी आपले भक्तगण मान्यच करणार हे ज्यांना ठाऊक होते , आणि दलीता मधील लाभार्थी छोट्या मोठ्या सत्तेच्या उपकारा चे बोझ्या खाली दबल्याने निवडणुका या प्रचंड खर्चिक असल्याने ते लढण्याची हिंमत दर्शविणार च नाहीत हे ही त्यांनी गृहीत धरले होते बारामती येथे खा सुप्रिया ताई सुळे यांच्या प्रचाराला जाऊन बऱ्याच वल्गना तेथे केल्या होत्या. यातून राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वच शीर्ष नेते हे उपकाराच्या ओझ्या खाली आपणास तिकीट देतील आणि उत्तम राव जानकर यांना उमेदवारी म्हणजे माळशिरस तालुक्यात सार्वत्रिक दिवाळी पाडवा च,,,,!
असे चित्र त्यांनी उभे केले असले तरी ही मी खात्री ने सांगतो की आज चे क्षणाला त्यांच्या कडे 30 हजार चे वर मतदारांचे संख्या बळ नाही मोहिते पाटील , मूळ राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना व काँग्रेस यांच्या मताधिक्य चे आड आपण तरून जाऊ अशी त्यांची समजूत आहे
म्हणूनच मुंबई आज तक ला मुलाखत देताना महायुती म्हणजे जंगलाला लागलेला वणवा होता व तो सामाजिक विभागाच्या चिमण्यांनी विझवला ,,,
अश्या बातां मारताना त्यांनी अजित दादा यांना बिबट्या ची उपमा दिली.ज्याला प्रत्युत्तर प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिले”आटपाडी देवस्थानची जमीन हडप करणाऱ्या उत्तम राव जानकर यांची प्रवृत्ती कुत्र्याची आहे”आमदारकीचे हाडुक चघळायला मिळावे ते कोणाच्या उन्नती साठी नाही , निवडणुका आल्याने त्यांना धनगर समाजाची फसवणूक भाजपने केल्याचा साक्षात्कार झाला.तो साक्षात्कार सोलापूर लोकसभेचे तिकीट भाजपा कडे मागताना झाला नव्हता काय?
असो त्या वृत्ती प्रवृत्ती वर पुस्तक लिहून होईल इतकी माहिती माझ्याकडे आहे .ते स्वतःला किती ही धूर्त समजत असले तरी ही “लबडीचा पहाड पाडण्यासाठी सत्याची पहार पुरेशी ठरते”मी ही 35वर्ष सामाजिक राजकीय चळवळीत आहे , आणि आजवर तालुक्यातील च काय कोणत्याही ठिकाणच्या माणसांची फसवणूक , विश्वासघात मी केलेला नाही.
राजकारणात युद्ध खेळताना साधनाची कमतरता त्यांना जाणवते जे कोते व जातीय प्रवृत्ती चे असतात , सगळ्या जाती धर्मातील जनतेला माझी मानवता वादी भूमिका माहीत आहे , आणि लढवय्ये पण ही ज्ञात आहे.तुमचा मुकाबला मीच करणार ,, आणि शिकार ही करून दाखवणार ,,,,, याचे कारण आम्ही एक हाथ लाकडाची एकच हाथ ढलपी काढतो तुमच्या सारखे आवाक्या बाहेरचे भपके बाज बोलत नाही हळू हळू चित्र स्पष्ट होत जाईल ,, मी आज एवढेच सांगतो की उत्तमराव जानकर यांचा पराभव झाला तर त्यात आच्छर्य मानू नकाते त्यांच्या प्रारब्धा चे भोग आहेत असत्या ला पराभूत व्हावेच लागते.