political

हर्षवर्धन पाटील,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,महाविकास आघाडीत येणार हातात ‘तुतारी’ घेणार

हर्षवर्धन पाटील,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,महाविकास आघाडीत येणार हातात ‘तुतारी’ घेणार

संचार प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे माजीमंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. दुसरा धक्का नगर जिल्ह्यात वसण्याची शक्यता आहे. भाजपचे विवेक कोल्हे हे हातात ‘तुतारी’ घेऊन आगामी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यताना मंगळवारी पुण्यामध्ये पुष्टी मिळाली आहे.

पुण्यातील मांजरी येथे मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार आणि इतर नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद

—————————————————————

नऊ बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत?

लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे, भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख आणि विवेक कोल्हे यांनी

नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत प्रवेशासाठी पडद्याआडून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

————————————————————पवार एकत्रित जेवण केले. तसेच त्यांची वैठकही झाली. विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शरद पवार त्यांच्या गाडीतून निघाले. त्यावेळी विवेक कोल्हे वाजूला उभे असताना शरद पवार यांनी विवेक कोल्हे यांना स्वतःच्या गाडीत वसण्याची सूचना केली त्यानंतर कोल्हे हे पवारांच्या गाडीत वसून रवाना झाले. विवेक कोल्हे यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे भाजपच्या माजी आमदार आहेत. परंतु २०१९ मध्ये त्यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजकीय खेळीमुळे हा पराभव झाल्याचा कोल्हेंचा आरोप आहे. तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले, आजच्या वैठकीमध्ये संस्थेच्या संदर्भातील चर्चा झाली. राज्यात अनेक ठिकाणी साखर कारखान्यासंदर्भात जागेसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार गटात प्रवेश करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button